Monday, March 18, 2019


19-03-19{१०-३०am}
आता खवळला हा समुद्र तरी त्याचा दरारा नाही...
इथे प्रत्येक गोष्टीला प्रेमाचा किनारा नाही...
कितीही मनापासून प्रेम करा या मतलबी दुनियेवर,
इथे स्वतःसारखा स्वतःला कोणाचाच सहारा नाही...
*कवी-वैभव शिंदे 【प्राण-जल】*
*कवठे-एकंद (तासगाव,सांगली)*

Thursday, March 14, 2019

भुकेचं पोट भरण्यासाठी त्या बापाला आयुष्याशी लढावं लागलं...
काही वेळासाठी त्या लेकीला बापापेक्षाही मोठं होऊन काठीवर चढावं लागलं...

कवी-वैभव शिंदे
कवठे-एकंद
14-03-2019
(४-००pm)

Tuesday, March 12, 2019

08-03-2019
(४-३९pm)
माझ्या शरीरातील तो प्राण आणि पंचमहाभूतांच ते जल...
आयुष्यात एवढं सोपं नाही,
दुसऱ्यासाठी स्वतः होणं "प्रांजल"........
💞Dedicate my Lovely 'Sister'💞

कवी-वैभव शिंदे
कवठे-एकंद

Tuesday, February 26, 2019


27-02-2019 (११-५०am)
तुला पाहणं, तुला आठवन,तुला विसरणं,
हा तर माझ्या मनाचा मेळ होता...
माझा कामापूरता वापर करून घेणं,
हाच तू माझ्या जीवनाशी खेळलेला खेळ होता...
From- Vaibhav Shinde
*प्राण-जल*
तुझी आठवण मला नेहमी त्रास देत राहील😰


26-2-19 (८:१५pm)
मी ठेवलेल्या विश्वासाचा विश्वास-घात करणाऱ्यांवर मी नाराज आहे...
स्वतःच्या जिवापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर केलं म्हणून स्वतःवर मी नाराज आहे...
कधी काही चुकलं असेल माझं तर मला माफ कर,
कारण आजपासून मी तुला आपल्या भावा-बहिणीच्या नात्यांमधून मुक्त करत आहे...
*कवी-वैभव शिंदे*
*निशब्द*
*(प्राण-जल)*

Sunday, February 24, 2019


*प्राण-जल*
नदीसारखी प्रेमानं वाहत असलेली माझी बहीण तू,
सत्य आणि अहिंसेचा एक मोठा समुद्र बनवं मला.......
माझं तर प्राण-जल आहेस तू,
ज्या वेळी होईल चूक माझी त्या क्षणी शिक्षा देण्याचा अधिकार तुला........
💞Dedicate my lovely Sister💞
कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे-एकंद (तासगाव,सांगली)
🙏

Wednesday, January 23, 2019

इथे कोण कोणाचा भाऊ,तर कोण कोणाची तरी बहीण आहे...
भले नातं रक्ताचं नसो,पण प्रत्येकाची एक कहाणी आहे...
सगळं दिसतं कोणी-कोणावर किती प्रेम केलं,
फक्त चेहऱ्यावर हसू तर डोळयात पाणी जुनंच आहे......
कवी-वैभव शिंदे (पर्ण)
कवठे-एकंद (तासगाव,सांगली)

Wednesday, January 16, 2019

Vaibhav Shinde 'प्रन'

'प्रन'
मी माझ्यात पाहिलेला एक 'प्रन' आहेस तू...
माझ्याच मनावर पडलेला मोठा प्रभाव आहेस तू...
मला कधीच एकट्याला सोडून जाऊ नको,
कारण कोणी परकी नाहीस तर माझी बहिण आहेस तू...😊
तुझाच सखा -Vaibhav Shinde
Kavathe-Ekand

Friday, January 11, 2019

Vaibhav Shinde

१२-०१-२०१९ (7-49am)
काहींच्या डोळ्यात तर काहींच्या डोळ्यासमोर आहे मी...
काहींच्या मनात तर काहींच्या हृदयात आहे मी...
प्रत्येकवेळी माझ्या आयुष्याशी खेळू नका कारण,
कधी भयाण शांतता तर कधी भयानक क्रोध आहे मी...
कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे-एकंद(सांगली)

Wednesday, January 9, 2019

तुम्हाला भाऊ,मित्र किंव्हा सखा म्हणणारी,तुमच्यावर हक्काने रागवणारी,रुसणारी आणि वेळ पडली तर तुम्हाला रडवणारी पण कधीच साथ न सोडणारी एक जरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर या कलयुगात तुमच्यासारखा 'नशीबवान' मनुष्य प्राणी दुसरा कोणताच नाही...😘
असं माझं 'वयक्तिक मत' आहे
लेखक-वैभव शिंदे
🙏🚩🙏

Monday, January 7, 2019

Vaibhav Shinde

तुमच्यावर नाराज नाही तरीही तुमच्यापासून कायमचाच दूर जातोय मी...
डोळयात आलेलं पाणी आता अलगत पुसतोय मी...
नेहमी आनंदी रहा माझ्या प्रियजनांनो...
कारण,आता स्वतःला परमेश्वरामध्ये विलीन करतोय मी.......

तुमचाच प्रिय-वैभव शिंदे

Vaibhav Shinde

ज्या माणसांसोबत मित्र-मैत्रिणी,भावा-बहिणीचं नातं जोडत गेलो मी...
या माणुसकीच्या नावाखाली पूर्णपणे बरबाद झालो मी...
कधी-कधी राग येतो माझा मलाच...
का म्हणून यांच्याशी प्रामाणिकपणाने वागत आलो मी...
              From -Vaibhav shinde

Wednesday, January 2, 2019

Vaibhav shinde

मी तुझं नाव काय लिहिलं त्या मातीवर...
आणि समुद्राच्या लाटा जन्मभरासाठी माझ्या  वैरी झाल्या...

कवी,लेखक,वक्ता-वैभव शिंदे
कवठे-एकंद

Tuesday, January 1, 2019

Vaibhav Shinde

आज मला कळलं की माझा सगळ्यात मोठा weak point म्हणेज मला सगळ्यांमध्येच परमेश्वर दिसतो ...त्यामुळे मला चांगली आणि वाईट लोक ओळखता येत नाहीत...
मी सर्वांनाच चांगलं समजतो...😢
कवी,लेखक वक्ता--वैभव शिंदे (कवठे एकंद)