27-12-2018 रोजी रात्री 7-02pm ला मी केलेल्या माझ्या 'चूक'या कवितेच्या काही ओळी...फक्त त्यांच्यासाठी ज्यांच्या भावना,मन माझ्यामुळे दुखावले...
झालेल्या चुका विसरून नवीन वर्षामध्ये आपण मैत्रीचे संबंध अधिक दृढ बनवू.....
चूक
काळजावर घाव बसले ,
मनाला ठेच लागली...
ते जुने दिवस आठवले,
आणि डोळ्याची पापणी अलगत ओली झाली...
'ती अशी मी काय चूक केली'.......
तुमच्या काळजीपोटी तुम्हाला खूप बोललो मी...
पण मनापासून कधी दूर नाही ठेवलं...
मानलं होत तुम्हाला मनापासून आपलं...
पण कधी बोलून नाही दाखवलं...
यात माझी काय चूक,
तुम्हाला माझं तुमच्यासोबत राहणंच नाही आवडलं...
जिला मनापासून बहीण मानलं
ती माझ्याशी असं वागेल असं वाटलं नव्हतं...
ज्याला प्रिय मित्र म्हणालो
तोही बोलायचं टाळेल असं वाटलं नव्हतं...
तुम्ही माझ्याशी बोलतं नाही
'ती अशी मी काय चूक केली'
मनाला खूप समजावलं,
की तुमच्याशिवाय ही जगू शकतो मी...
पण माझं मन होतं खूप हळवं,
ज्याला आपली माणसं नाही ओळखता आली...
'ती अशी मी काय चूक केली'
कवी-वैभव शिंदे
कवठे-एकंद
(सांगली)
Mob No-8421490987